स्टँडअलोन पर्सनल प्लॅन्समधील समावेशन आणि अपवाद

स्टँडअलोन पर्सनल प्लॅन्समधील समावेशन आणि अपवाद

व्यक्तिगत अपघात स्टँडअलोन प्लॅन विकत घेण्याची योजना बनवीत आहात? अपवाद आणि समावेशान करण्यासाठी फाईन प्रिंट वाचण्याचे विसरू नका. येथे एक संपूर्ण मार्गदर्शक चेकलिस्ट आहे.
स्टँडअलोन पर्सनल प्लॅन्समधील समावेशन आणि अपवाद
नावाप्रमाणेच, वैयक्तिक अपघात स्टँडअलोन योजना आपणास नुकसान, अस्थायी किंवा स्थायी आंशिक / पूर्ण विकलांगता इत्यादिंमुळे होणाऱ्या हानींविरुद्ध संरक्षण देते. संशोदन असे दर्शवते की भारतामध्ये दररोज अपघातांमुळे १२१४ लोक मृत्यूस बळी पडत असतात, अशामुळे स्वतःला आणि परिवाराला विमायुक्त करणे आवश्यक ठरते. आपल्या सध्याच्या आरोग्य विम्यामध्ये अपघात आणि आपात्कालीन परिस्थितीसाठी उप-मर्यादा असली तरीही हे पुरेसे नाही.
व्यक्तिगत अपघात स्टँडअलोन योजनेची निवड करताना, आपण समावेशान आणि अपवाद यावर भर दिला पाहिजे. तसे केल्यास आपल्याला अशा दुर्घटनांच्या बाबतीत काय अपेक्षित आहे याची चांगली कल्पना येईल.

व्यक्तिगत अपघात विमा योजनेतील समावेशन

१. अपघातांमुळे होणारे सर्व नुकसान किंवा दुखापती सहसा येथे समाविष्ट केल्या आहेत. यात बाह्य, हिंसक आणि दृश्यमान माध्यमांचा समावेश आहे. यात मृत्यू किंवा अपंगत्व यांचा देखील समावेश होतो, जे खालीलपैकी कोणत्याही प्रसंगामुळे उद्भवू शकतात:

  • रेल्वे, रस्ते किंवा हवाई अपघात
  • टक्कर किंवा पडणे
  • गॅस सिलेंडर चा स्फोट होने
  • सर्पदंश, फ्रॉस्टबाईट किंवा कुत्र्याने चावणे
  • जळणे, बुडणे किंवा विषबाधा

२. वर उल्लेख केलेल्या कोणत्याही अपघातामुळे आपणास आंशिक किंवा पूर्ण अपंगत्व आल्यास, नुकसान आपल्या विम्यामधून मिळेल. कायमस्वरूपी किंवा अंशतः अपंगत्वाचे पद हे अंग, दृष्टी इत्यादीचे नुकसान होऊ शकते. तात्पुरते अपंगत्व म्हणजे अशी स्थिती ज्यामध्ये रुग्ण कार्ये पार पडु शकत नाही जशी तो अपघाताच्या आधी पार पाडायचा. दोघांसाठी वैयक्तिक वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक आहे जे वैयक्तिक अपघात स्टँडअलोन योजनेद्वारे संरक्षित केले जाईल.

मृत्यू किंवा कायमस्वरूपी अपंगत्त्व बाबतीत, एकरकमी विमा आहे. अंशतः अपंगत्वामध्ये, तुम्हाला एकूण रकमेसाठी जारी केलेल्या आठवड्यांमध्ये फिक्स टक्केवारी मिळते. अधिकतम कालावधी हा १०४ आठवड्यांचा असतो.

३. वैद्यकीय खर्चावर खालील गोष्टींसाठी तुम्हाला कव्हर केले जाईल:

  • दररोजच्या जखमांवर वैद्यकीय खर्च आणि उपचार
  • हॉस्पिटलायझेशन आणि तत्सम खर्च
  • सुधारात्मक शस्त्रक्रियेसाठी खर्च
  • पॉलिसीधारकांच्या मृत्युनंतर अंत्यविधीचा खर्च
  • मृत्यूसाठी दुहेरी नुकसानभरपाई
  • सार्वजनिक वाहतूक वापरताना स्थायी अक्षमतेसाठी दुहेरी क्षतिपूर्ति
  • मृत्यू झाल्यास किंवा पूर्ण अपंगत्व असल्यास पॉलिसीधारकाच्या मुलांसाठी शिक्षण खर्च

वैयक्तिक दुर्घटना स्वतंत्र योजनेतील अपवाद

  • आत्महत्या करण्याचा प्रयत्न किंवा स्वतःची कारणीभूत इजा
  • नागरी अशांतता किंवा युद्धामुळे झालेल्या दुखापती
  • ड्रग्स आणि अल्कोहोल मुळे अपघात
  • एचआयव्ही / एड्स मुळे मृत्यू
  • अव्यवस्थित वागणुकीमुळे झालेली दुखापत
  • हेतुपरस्पर कृत्य किंवा आत्महत्या प्रयत्न
  • लष्कर, पोलिस दल किंवा पॅरामिलिट्री सोबत कर्तव्यात असलेल्या कर्मचार्यांसाठी
  • असुरक्षित आणि धोकादायक खेळांमध्ये भाग घेणे

वैयक्तिक अपघात विमा पॉलिसीचे फायदे

वैयक्तिक दुर्घटना योजना कुटुंबातील कमावत्या व्यक्तीसाठी अत्यंत शिफारसीय आहे. ही आपणास खालील फायदे मिळविण्याची हमी देते:

  • कुटुंबाची आर्थिक सुरक्षा
  • वैद्यकीय चाचण्या किंवा दीर्घ कार्यपद्धती पासून सूट
  • बऱ्याच प्रकरणांमध्ये आरोग्य विम्यापेक्षा कमी प्रीमियम
  • समूह योजना पर्याय
  • विदेशी कव्हरेज उपलब्धता
  • पॉलिसीहोल्डरच्या मृत्यूनंतर मुलांसाठी शैक्षणिक सुरक्षा
  • कस्टमायझेशन पर्याय
  • इतर तत्सम लाभ

व्यक्तिगत अपघात विमा कोणी विकत घ्यावा ?

जो कोणी कामासाठी बाहेर पडतो आणि जो घरतला एकमेव कमाऊ व्यक्ती आहे किंवा घरातल्या आर्थिक गरजा पूर्ण करतो ते वैयक्तिक अपघात प्लॅन घेऊ शकतात. असे केल्याने आपल्याला विविध फायदे मिळतील. १८ ते ६५ या वयोगटातील कोणीही याचा लाभ घेऊ शकतात. आपले वय, व्यवसाय आणि आरोग्य यापैकी काहीही असले तरीही कमाई सुरु करताच आपण ही योजना खरेदी करावी.

आता, आपल्या प्रिय व्यक्तींबद्दल विचार करण्याची वेळ आहे आणि आपणास काही त्रासदायक घटना घडून आल्यास ते कसे व्यवस्थापन करतील. सावधानता नेहमीच बरे करण्यापेक्षा चांगली असते, म्हणूनच योग्य कव्हरेजमध्ये योग्य गुंतवणूकीशी अनपेक्षितपणे स्वतःला तयार करा.