Individual or Family Floater Health Insurance Which Is the Best Option-

वैयक्तिक अथवा कौटुंबिक फ्लोटर आरोग्य विमा यापैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?

कौटुंबिक फ्लोटर्स आणि वैयक्तिक योजनांचे स्वत:चे वेगवेगळे लाभांचे संच असतात. यापैकी एकाची निवड करणे जरासे युक्तीचे आहे. तुम्ही निवड करण्यापुर्वी ही मार्गदर्शिका पहा.

वैयक्तिक अथवा कौटुंबिक फ्लोटर आरोग्य विमा यापैकी कोणता पर्याय सर्वोत्तम आहे?

अपघात, आजार आणि आजारपण कोणतेही इशारे देऊन येत नाहीत आणि जेव्हा ते येतात तेव्हा एखाद्या चक्रीवादळाप्रमाणे ते तुमची सर्व बचत झाडलोट करुन नेल्यासारखी संपवतात. परिणामी संपूर्ण आर्थिक नुकसान होते आणि प्रचंड भावनिक आणि शारिरिक ताण येतो. असे प्रसंग तुम्हाला इतरांवर आर्थिकरीत्या परावलंबी बनवतात. म्हणून उचित आरोग्य विमा असणे अत्यावश्यक आहे. पण तुम्ही वैयक्तिक योजना घ्यावी की कौटुंबिक फ्लोटर? तर दृष्टीकोन असा आहे-

वैयक्तिक योजनेचे साधक मुद्दे

नावाने निर्देशिल्यानुसार, वैयक्तिक आरोग्य विमा एका व्यक्तीस संरक्षण देतो. तुमचे हप्ते भरून केवळ तुम्हाला भरपाई मिळेल.

कॅशलेस दावा सेवा

या प्रकारच्या विम्यामध्ये तुम्हाला कॅशलेस (नगद पैसे न भरता) दावा सेवेचा लाभ मिळतो. विमा पॉलिसीमध्ये नेटवर्कमधील रुग्णालयांची यादी दिलेली असते. ही रुग्णालये तुम्हाला कोणत्याही वैद्यकीय सेवांच्या मालिकेसाठी कॅशलेस लाभ देतात. तुम्हाला त्यासाठी रुग्णालयात पैसे भरावे लागत नाहीत.

रुग्णालयात भरती असतानाचा दैनंदिन भत्ता

वैयक्तिक योजनांमध्ये देखील रुग्णालयात भरती असतानाचा दैनंदिन भत्ता मिळण्याची तरतूद आहे. तुम्हाला दैनंदिन भत्ता मिळणे हे पॉलिसीधारक म्हणून लागू आहे. तरीदेखील, हे लागू होण्यासाठी रुग्ण किमान दिवस रुग्णालयात भरती होणे आवश्यक आहे

कर लाभ

आयआरडीएनुसार, तुम्ही भरलेल्या हप्त्यावर कर लाभासाठी पात्र असता. आयकर अधिनियम, १९६१ च्या कलम ८० सी नुसार ही तरतूद उपलब्ध आहे.

परंतु खालील बाबींकडे लक्ष द्या:

१. अनेक वैयक्तिक आरोग्य योजनांचे प्रतीक्षा कालावधी अधिक असतात.

२. तसेच, ते अधिक महाग ठरू शकतात. अधिक आर्थिक दबाव कुटुंबाच्या पोशिंद्या व्यक्तीवर येऊ शकतो. प्रत्येक सदस्यास वेगळी योजना घेतल्यास, किंमती अत्यंत जास्त होऊ शकतात.

३. तुम्ही दाव्याचे लाभ इतर सदस्यांसमवेत हस्तांतरित अथवा सामायिक करू शकत नाही.

कौटुंबिक फ्लोटर योजनेचे साधक मुद्दे

कौटुंबिक फ्लोटर योजना या एक परिवार एक पॉलिसी या संकल्पनेवर आधारित असतात. इथे, परिवाराच्या विविध सदस्यांचा एकाच आरोग्य योजनेच्या अंतर्गत समुह केला जातो. म्हणून अनेक योजना घेण्याऐवजी एक समान योजना परिवाराच्या सर्व सदस्यांसाठी उपलब्ध आहे.

अधिक विमा रक्कम

कौटुंबिक फ्लोटर योजना तुम्हाला अधिक विमा रक्कम अथवा दावा रकमेचा लाभ देतात. वैयक्तिक विमा पॉलिसीजच्या तुलनेत, कौटुंबिक योजना या अधिक विमा रकमेचे संरक्षण मिळवून देतात. उदाहरणार्थ, ४ सदस्यांसाठी रु.५ लाख  इतकी विमानितीऐवजी तुम्ही एक रु.२० लाखाची कौटुंबिक फ्लोटर योजना खरेदी करू शकता. परिवाराच्या सर्व सदस्याना ही रक्कम वाटून दिली जाते.

उदाहरणार्थ, एका सदस्याचा गंभीर अपघात झाला. दावा रु. १० लाखांचा केला गेला. तुमची विमा कंपनी ही रक्कम देऊ शकेल. या घटनेमध्ये रु.१० लाख तरीही पुढील वर्षभर शिल्लक राहतील.

तुमच्या परिवारास आरोग्याची किंमत चुकवण्यास भाग पाडू नका! त्यांच्यासाठी सुरक्षित आरोग्य विमा संरक्षण घ्या! 

सर्व सदस्याना संरक्षण मिळते

यातून तुमचा जोडीदार (पती, पत्नी), भावंडे, मुले, पालक यांना संरक्षण मिळेल. काही प्रकरणांमध्ये विस्तारित परिवार जसे सासरचे लोक देखील संरक्षित केले जातात. तुम्ही नवीन सदस्य देखील या योजनेत पॉलिसीच्या मार्गदर्शिकेनुसार जोडूता येऊ शकतात.

कर लाभ

वैयक्तिक योजनांप्रमाणेच आयकर अधिनियमाच्या कलम ८० डी नुसार कर कपातीचा लाभ देखील तुम्हाला मिळेल. एक अतिरिक्त फायदा असा आहे की तुम्ही जर तुमच्या पालकांच्या पॉलिसीचे पैसे दिल्यास तुम्ही कर लाभ देखील दुप्पट करू शकता. 

अधिक वैद्यकीय विमा संरक्षण

या योजनेनुसार तुमच्या परिवारास चांगले वैद्यकीय संरक्षण मिळते. व्यापक संरक्षणामध्ये वैद्यकीय प्रक्रियांचे खर्च, रुग्णालयाची मूल्ये, डॉक्टरचे सल्ले, रुग्णालयाच्या कर्मचार्‍यांची काळजी, रूग्णवाहिकेचा खर्च आणि इतर खर्च यांचा समावेश असतो. तुम्हाला अतिरिक्त लाभांमध्ये मोफत वैद्यकीय तपासणी देखील मिळू शकते. इतर लाभांमध्ये इथे पुढील गोष्टींचा समावेश होतो-

  • अधिक सवलती आणि लाभ तुमच्या संपूर्ण परिवारास उपलब्ध होतात.
  • काही केसेसमध्ये, सातत्याने कौटुंबिक संरक्षण देखील दिले जाते. इथे तुम्ही एकाच वेळेस सलग दोन वर्षे संरक्षित केले जाल. हप्त्यामध्ये कोणतीही वाढ होणार नाही याची हमी या कालावधीत दिली जाते.

परंतु खालील गोष्टींकडे लक्ष द्या-

  • ज्येष्ठ नागरिक नुतनीकरणाच्या अधिकतम वयाचे होईपर्यंतच केवळ या पॉलिसीजचे नुतनीकरण करता येते. समजा एका विशिष्ट कंपनीसाठी हे अधिकतम वय ६० वर्षे आहे. अशा प्रसंगी ज्येष्ठ सदस्यासाठी वेगळी पॉलिसी घेणे गरजेचे असते.
  • तसेच, एकदा तुमची मुले (साधारणपणे) २५ वर्षांची झाली की त्यांच्याकरीता वेगळ्या पॉलिसीज घ्याव्या लागतात. अर्थातच हे प्रत्येक विमा कंपनीसाठी वेगवेगळे असते.

आदर्शपणे, या दोन योजनांचे मिश्रण अनेक परिवारांसाठी उत्तम काम करते. तुम्ही कौटुंबिक फ्लोटर तरुण सदस्यांसाठी, विशेषत: तुमच्या लहान मुलांसाठी घेऊ शकता. पालक आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी, वैयक्तिक अथवा ज्येष्ठ नागरिक योजना घेता येऊ शकेल. अशा प्रकारे, तुम्ही अधिक कमी किंमतीत तुमचे विमा संरक्षण अधिकतम वाढवू शकता.