health-insurance-for-woman

महिला आणि मुलींसाठी विशेष आरोग्य विमा योजना

महिलांसाठी विशेष आरोग्य विमा योजना. लाभ समजून घ्या आणि वैद्यकीय खर्चापासून तुमच्या कुटुंबाला व स्वत:ला सुरक्षित करा.

आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र महिला म्हणून, अचानक येणारा वैद्यकीय खर्च तुमच्या आयुष्यातील योजनांच्या मार्गावरील अडथळा होऊ देऊ नका. महिलांसाठी विशेष संरेखित असा एक आरोग्य विमा खरेदी करा आणि तुमच्या वैद्यकीय खर्चांचा ताबा घ्या. अशा योजनांद्वारे आपल्याला मिळणाऱ्या वैशिष्ट्यांची यादी खाली दिलेली आहे:

१. विशेष लाभ– विशेषत: महिलांसाठीची एक आरोग्य विमा योजना महिलांना प्रभावित करणार्‍या साधारण विशेष संरक्षण देते, जसे स्तनाचा कर्करोग, गर्भाशयाचा कर्करोग इ.

२. विशेष सवलती– काही आरोग्य विमा योजना महिलांसाठी सलवती प्रस्तुत करतात, अशाप्रकारे तुम्ही मेडिक्लेम पॉलिसी परवडणार्‍या दरात खरेदी करू शकता.

३. विशेष अधिकार– काही आरोग्य विमा योजना स्त्रीयांच्या विशेष आजारांच्या निदानावर एकठप्पीएकरकमी लाभ देतात.

४. कर लाभ– इतर सर्व वैद्यकीय विमा योजनांप्रमाणेच, या योजना देखील तुम्हाला आयकर अधिनियमाच्या ८० डी नुसार कर लाभ मिळवून देतात.

महिलांसाठी विशेष योजनांची यादी खालीलप्रमाणे आहे:

टाटा एआयजी जनरल इंशुरंस कंपनी द्वारे वेलशुरंस वुमेन पॉलिसी

ही योजना विशेषत: महिलांसाठी आहे आणि तिचे तीन विविध प्रकार आहेत, इलाईट, सुप्रिम आणि क्लासिक ज्यात विविध संरक्षण रकमेचे पर्याय आहेत. इतर लाभ खालीलप्रमाणे आहेत-

  • संरक्षित रकमेइतके रुग्णालयाचे खर्च सुरक्षित केले जातात
  • हे विविध प्रकार विविध संरक्षण रकमेचे पर्याय रु.३,००,००० ते रु.७,५०,००० रकमेच्या श्रेणीत प्रस्तुत करतात.
  • पॉलिसीच्या शब्दांत सांगितल्यानुसार कर्करोगाच्या निदानाच्या घटनेत एकठप्पी एकरकमी रक्कम दिली जाते.

बजाज एलियाञ्झ जनरल इन्शुरन्स विशिष्ट आजार असलेल्या महिलांसाठी विमा

ही गंभीर आजारासाठीची योजना बजाजने प्रस्तुत केली आहे, जी पॉलिसीमधील सूचीबद्ध केलेल्या ८ आजारांपैकी एकाचे निदान विमाधारकाला असल्याचे आढळल्यास एकठप्पी एकरकमी रक्कम प्रस्तुत करते. याशिवाय, ही पॉलिखी खालील विशेष लाभ मिळवून देते:

  • जर बाळाचा जन्म जन्मजात अपंगत्वासहित झाल्यास संरक्षित विमा रकमेच्या ५०% एकठप्पी रक्कम दिली जाते.
  • रु.५०,००० ते रु.२,००,००० श्रेणीत विमा संरक्षणाचे पर्याय उपलब्ध आहे.
  • महिलेला गंभीर आजार झाल्यापासून ३ महिन्यांत बेरोजगार झाल्यास रु.२५,००० एकठप्पी रक्कम दिली जाते.
  • मुलांच्या शिक्षणाकरीता बोनस रु.२५,००० दिले जातात.

महिलांसाठी संरेखित विशिष्ट योजनांसमवेतच अनेक योजना आहेत ज्या मुलगी असलेल्या कुटुंबासाठी विशेष लाभ प्रस्तुत करतात.

रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीची रिलायन्स हेल्थगेन योजना

मुलीला संरक्षित करण्याकरीता ५% सवलत हप्त्यांमध्ये देऊन ही योजना कुटुंबांना त्यांच्या मुलींना संरक्षित करण्यास प्रोत्साहित करते. दोन प्रकार या योजनेत आहेत आणि या योजनेच्या ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत:

  • रु.३,००,००० ते रु.१८,००,००० च्या दरम्यान संरक्षित विमा रकमेसह रूग्णालयाचा खर्च दिला जातो.
  • अती गंभीर आजाराच्या केसमध्ये, विमाधारकाला एक-वेळेस प्रीमियम नुतनीकरणाची सुट मिळते.

न्यु इंडिया अॅश्युअरन्स क. लि. ची न्यु इंडिया आशा किरण पॉलिसी

ही आरोग्य विमा योजना अशा विशेषत: कुटुंबांसाठी आहे ज्यांना आर्थिकदृष्ट्या अवलंबून लहान मुलीचा आरोग्य विमा खरेदी करावयाचा आहे. या योजनेच्या काही ठळक बाबी खालीलप्रमाणे आहेत:

  • विमाधारकाला पॉलिसीमधील सूचीबद्ध केलेल्या गंभीर आजारांपैकी एकाचे निदान झाल्यास एक अतिरिक्त एकठप्पी रक्कम दिली जाते.
  • अतिरिक्त वैयक्तिक अपघात अपंगत्व लाभ योजनेचा भाग म्हणून उपलब्ध आहे.

अशा आरोग्य विमा योजनांबाबत अधिक माहिती घ्या आणि तुमचे आर्थिक आरोग्य आजच सुरक्षित करा.