Vital facts cancer insurance

आरोग्य विम्यामधील कर्करोग विमा योजनांबाबतीतील गंभीर सत्ये

कर्करोग विमा योजना तुम्हाला कर्करोगाच्या निदानानंतरच्या उपचारांच्या खर्चांपासून संरक्षण देतात. या योजनांबाबत अधिक माहिती करून घेण्यासाठी पुढे वाचा.

आरोग्य विम्यामधील कर्करोग विमा योजनांबाबतीतील गंभीर सत्ये

जीवनासाठी या रोगाशी झुंज देतादेता, कर्करोगामध्ये निदान, रेडिएशन, केमो आणि ऑपरेशनसाठी खुप खर्च येतो. जर तुमच्याकडे आरोग्य विमा पॉलिसी असल्यास, तुमची पॉलिसी या आजाराच्या उपचारांसाठी तुमच्या झालेल्या खर्चांसाठी संरक्षण देईल. कर्करोगाच्या विमा योजना तुम्हाला कर्करोगाच्या निदानानंतरच्या आर्थिक ओझ्यापासून वाचवतात.

कर्करोगाच्या विम्याची योजना काय आहे आणि ती कोणते संरक्षण देते?

कर्करोग विमा योजना या विशेष पॉलिसी आहेत ज्या विविध स्तरांवरील कर्करोगाच्या रुग्णांना (दुय्यम, गंभीर, अथवा प्रमुख) अतिरिक्त आर्थिक संरक्षण देतात. या योजना निदानात्मक आणि उपचार या दोन्हींच्या खर्चासाठी व्यापक संरक्षण देतात. या योजनांमध्ये कर्करोगाचे निदान आणि उपचाराचे खर्च यांचा समावेश असतो.

कर्करोगाच्या योजनांची उदाहरणे

योजनेचे नावप्रवेशाचे वयसंरक्षित विमा रक्कमपॉलिसीचा कालावधी
एचडीएफसी लाईफ कॅन्सर इन्शुरन्स१८ – ६५ वर्षेरु. १०,००,००० ते रु. ४०,००,०००१०-२० वर्षे
आयसीआयसीआय कॅन्सर केअर प्लस२०-६० वर्षेरु.५,००,००० – रु. २५,००,०००१० वर्षे
एरगॉन लाईफ आयकॅन्सर इन्शुरन्स१८ – ६५ वर्षेरु. १०,००,००० ते रु.५०,००,०००किमान ५ वर्षे ते अधिकतम ७० वर्षे प्रवेश वयाला वजा करून

 कर्करो विमा पॉलिसी असण्याचे फायदे

कर्करोग विमा योजनांमुळे, तुम्हाला पुढील गोष्टी मिळतात-

  • आयकर अधिनियम कलम 80डी अंतर्गत तुम्ही दिलेल्या हप्त्यावर कर लाभ
  • कर्करोगाच्या निदानानंतर एकत्रित रक्कम
  • कर्करोगाच्या विविध स्तरांवरचे संरक्षण
  • विशिष्ट वर्षांसाठी आणि काही केसेससाठी उत्पन्नाचा लाभ
  • लवकर निदानाच्या काही केसेसमध्ये हप्ता माफी
  • तुमच्या गरजेनुसार हप्ता देयकाचे पर्याय

कर्करोग विमा पॉलिसीच्या मर्यादा

साधारणपणे, एक कर्करोगाचा विमा संरक्षित केलेल्या अटी अगदी विशिष्टपणे सांगतो. अनेक योजना पुढील गोष्टींना संरक्षण देत नाहीत:

  • त्वचेचा कर्करोग
  • जो कर्करोग प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षपणे एचआयव्ही अथवा एड्स मुळे झालेला आहे
  • जो कर्करोग रेडिएशन्स, रेडिओ अॅक्टिव्हिटी, जन्मजात स्थिती, रासायनिक संक्रमण इ. मुळे झाला आहे. वगळलेल्या कलमांच्या संपूर्ण यादीसाठी योजनेतील पॉलिसीच्या अचूक शब्दरचनेचा संदर्भ पहा.
  • उत्तरजीवित्व कालावधी – सर्व कर्करोगाच्या पॉलिसीजना उत्तरजीवित्व कालावधी असतो जो कालावधी आजाराच्या निदानानंतर उत्तरजीवित्वाच्या गरजांना संरक्षित करतो. तुम्ही हा काळ जर उत्तरजीवी राहिल्यासच केवळ हा लाभ तुम्हाला मिळेल. विमा कंपनीनुसार उत्तरजीवित्व कालावधी ७ ते १८० दिवसांच्या श्रेणीमध्ये कोणताही असू शकतो.
  • प्रतीक्षा कालावधी – सर्व कर्करोग योजनांना प्रतीक्षा कालावधी असतो ज्यादरम्यान आजाराचे निदान झाल्यास, त्याचे संरक्षण मिळत नाही.

कर्करोग विमा आणि गंभीर आजार योजनेमधील फरक

 गंभीर आजार योजनाकर्करोग विमा
स्थितीगंभीर स्थिती जसे अवयव निकामी होणे आणि प्रत्यारोपण, आंधळेपणा, लकवा, इ. साठी संरक्षण देते आणि कर्करोगाच्या विशिष्ट गंभीरतेसाठी संरक्षण देतो.केवळ विविध स्तरांवरील कर्करोग संबंधित खर्चांना संरक्षण देतो.
देयकगंभीर स्थितीच्या निदानानंतर एकठप्पी रक्कमदेयकाचा मोड निवडण्याचा पर्याय देतो.
पॉलिसी कालावधीपॉलिसीचा कालावधी यादीत नमूद कोणत्याही गंभीर आजाराच्या निदानानंतर संपतोपहिल्या निदानानंतर पॉलिसीची मुदत संपत नाही

 तुम्हाला कर्करोगाच्या विम्याची गरज आहे का?

कर्करोगाच्या आजाराच्या उपचाराशी संबंधित तुमचे खर्च कर्करोगाच्या विम्याची योजना संरक्षित करते. आरोग्य विमा योजनेच्या उलट रुग्णालयात भरतीशी संबंधित नसलेले खर्च देखील ही योजना संरक्षित करेल. कर्करोगाचा कौटुंबिक इतिहास असलेल्या अथवा घरातील पोशिंदी असलेल्या व्यक्तीसाठी हा प्रशंसनीय पर्याय असेल.

जर कर्करोगाच्या विम्यासमवेत आरोग्य अथवा जीवन विमा योजना असल्यास तुम्हाला पूर्ण आर्थिक संरक्षण मिळेल.