health-insurance-premium-calculation-components

आरोग्य विम्याच्या हप्त्याची गणना आणि त्यातील समाविष्ट घटक

तुम्ही धुम्रपान अथवा मद्यपान करता का? तुम्ही ६५ व्या वर्षानंतर आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करण्याची योजना करत आहात का? जर हो असेल, तर तुमच्या वैयक्तिक आरोग्य विम्याचे हप्ता भरमसाठ वाढलेले असू शकता. का ते खाली बघा.

आरोग्य विम्याच्या हप्त्याची गणना आणि त्यातील समाविष्ट घटक

तुम्ही जो हप्ता (प्रीमियम) तुमच्या आरोग्य विमा पॉलिसी घेण्यासाठी चुकता करत आहात, तो निश्चित कालावधीसाठी वैद्यकीय उपचारांच्या किमतीएवढेच विमा संरक्षण तुम्हाला खात्रीपुर्वक देईल. या हप्त्याच्या गणनेमध्ये हमीपुर्वक मार्गदर्शक तत्वांचा समावेश होतो आणि यामुळे हे थोडेसे गुंतागुंतीचे होते. तरीदेखील, तुमच्या वैयक्तिक आरोग्य विमा पॉलिसीच्या हप्त्याच्या गणनेसाठी जे तीन महत्वाचे घटक लक्षात घेतले जातात ते खालीलप्रमाणे आहेत:

१. प्रथम आहे विमा संरक्षणाचा कालावधी

२. दुसरा आहे तुम्ही निवडलेले संरक्षण

३. तिसरा आहे जोखीम म्हणजेच निश्चित कालावधीमध्ये तुम्ही दावा करण्याची शक्यता

खाली प्रत्येक घटकाचे तपशीलवार स्पष्टीकरण दिले आहे:

  • विमा संरक्षणाचा कालावधी

विम्याचा कालावधी हप्त्याच्या रकमेवर प्रभाव पाडतो, वर्षे जितकी अधिक असतील तितकीच तुमच्या हप्त्याची रक्कमही अधिक असेल. बहुतांश आरोग्य विमा पॉलिसी तुम्हाला संरक्षण कालावधीची निवड करण्याचा पर्याय देतात. तुम्ही एक, दोन किंवा तीन वर्षांसाठी योजना खरेदी करू शकता आणि त्यांचे त्या कालावधीनंतर नूतनीकरण करू शकता.

अधिक कालावधीसाठी विमा संरक्षण देणार्‍या पॉलिसीबाबतची चांगली गोष्ट ही आहे की त्यांच्या हप्त्यावर सवलत असते ज्यामुळे अधिक कालावधीची पॉलिसी खरेदी करणे विचार करण्यासारखे आहे.

  • विमा संरक्षण

संरक्षण ढोबळपणे तीन घटकांनी परिभाषित केले जाते, अनुक्रमे, संरक्षणाचा प्रकार, प्रस्तावित लाभ आणि संरक्षण रक्कम अथवा विम्याची रक्कम. याचा हप्ता गणनेवर खालीलप्रमाणे परिणाम होतो:

संरक्षणाचा प्रकार

तुम्ही वैयक्तिक योजना अथवा पारिवारिक फ्लोटरचा पर्याय निवडला अथवा अगदी तुमच्या संपुर्ण कुटुंबासाठीची एखादा वैयक्तिक योजना निवडला तरी त्याचा थेट परिणाम तुमच्या हप्त्यावर होतो. कौटुंबिक फ्लोटर योजनामध्ये हप्त्याची गणना कुटुंबातील वयाने सर्वात मोठ्या सदस्याचे वय, योजना अंतर्गत संरक्षित सदस्यांची संख्या आणि प्रौढ आणि मुलांच्या संख्येनुसार केली जाते.

वैयक्तिक योजनामध्ये विम्याने सुरक्षित सदस्याचे वय देखील लक्षात घेतले जाते. जेव्हा तुम्ही एखादा वैयक्तिक योजना संपूर्ण कुटुंबासाठी खरेदी करता, तेव्हा त्याच पॉलिसीमध्ये कुटुंबातील एकापेक्षा जास्त सदस्यांचे विमा संरक्षण घेतल्यानंतर तुम्हाला हप्त्यावर सवलत देखील मिळू शकते. या केसमध्ये तुम्ही जे पैसे देता त्यांची गणना योजनामध्ये समाविष्ट असलेल्या वैयक्तिक सदस्यांच्या वयानुसार केली जाते.

लाभांची संख्या

तुमच्या पॉलिसीमध्ये प्रस्तावित लाभांच्या संख्येचा तुमच्या हप्त्यावर थेट परिणाम झालेला असतो. तुमच्या योजनामध्ये अधिक लाभ असल्यास तुम्ही अधिक मूल्याचा हप्ता देण्याची शक्यता आहे. म्हणून तुम्ही चोखंदळ असणे आवश्यक आहे आणि केवळ अत्यावश्यक गोष्टी निवडणे गरजेचे आहे. निवडावयाच्या विविध आरोग्य विमा योजनांची तुलना करा आणि लाभांची योग्य यादी निवडा. जेव्हा तुम्हाला आवश्यक नसेल तेव्हा अतिरिक्त लाभांसाठी पैसे भरणे टाळा. उदा. जर तुम्ही भविष्यात मुलांना जन्म न देण्याचा विचार करीत असाल तर प्रसुती संरक्षणासोबतचा योजना खरेदी करू नका.

विम्याची रक्कम अथवा विमा संरक्षण रक्कम

तुम्ही निवडलेल्या विमा संरक्षणाच्या रकमेचा अथवा विम्याच्या रकमेचा तुमच्या हप्त्यावर थेट प्रभाव पडतो. ही रक्कम जितकी अधिक असेल तितकाच हप्ताही अधिक असेल.

कमी हप्ता भरून अधिक जास्त विमा रकमेचे संरक्षण मिळवण्यासाठी, सुपर टॉपअप योजना मूळ योजनासमवेत खरेदी करा. सुपर टॉपअप योजना तुम्हाला अधिक संरक्षण तुलनेने कमी हप्त्यात मिळवून देतील.

  • जोखीम

दाव्याची शक्यता परिभाषित करण्यासाठी जोखीम ही संज्ञा वापरली जाते. अधिक जोखमीची व्यक्ती दावा लावण्याची शक्यता अधिक असते तर कमी जोखमीची व्यक्ती दावा लावण्याची शक्यता कमी असते. लक्षात घेतलेले जोखमीचे घटक खालीलप्रमाणे आहेत:

प्रवेशाचे वय

पॉलिसी खरेदी करतानाच्या वेळेचे वय अथवा नुतनीकरणाच्या तारखेच्या वेळेचे वय हप्त्यास प्रभावित करते. तुमचे वय जितके अधिक, तितका अधिक हप्ता तुम्ही भरण्याची शक्यता जास्त असते. जर तुम्ही निरीक्षण केले असेल तर, २५ व्या वर्षाच्या निरोगी व्यक्तीचा पॉलिसी खरेदी करतानाचा हप्ता हा ४० वर्षे वयाच्या व्यक्तीच्या हप्त्यापेक्षा कमी असतो. याचे कारण आहे की अधिक वयासमवेत वाढत्या जोखमीचे आजार येण्याची शक्यता जोडलेली असते. एका तरुण व्यक्तीपेक्षा एक वयस्कर व्यक्तीस अधिक आरोग्याच्या समस्या असण्याची शक्यता गृहित धरली जाते.

पुर्वस्थित वैद्यकीय स्थिती

पुर्व-स्थित वैद्यकीय स्थिती ही तुमची वैद्यकीय स्थिती आहे जी पॉलिसी खरेदी करताना अथवा त्या आधीपासूनच असते. अशा स्थितींचा तुमच्या पॉलिसीच्या हप्त्यावर मोठा प्रभाव पडतो. मधुमेह, अतिरक्तदाब आणि उच्च रक्तदाब या अगदी सामान्यत: आढळणाऱ्या पुर्व-स्थित वैद्यकीय स्थिती आहेत. विमा कंपन्या अशा पुर्व-स्थित वैद्यकीय स्थिती असणार्‍या व्यक्तीस जोखीम समजतात. सामान्यपणे, विमा कंपन्या अशा पुर्व-स्थित वैद्यकीय स्थिती असणार्‍या व्यक्तींच्या हप्त्याची रक्कम वाढवतात. मात्र, पुर्व-स्थित वैद्यकीय स्थिती अतिशय गंभीर असण्याच्या घटनेमध्ये विमा कंपनी तुम्हाला एखादी पॉलिसी नाकारू देखील शकते.

अनारोग्यदायी जीवनशैली

जोखीम ठरविण्याचा एक घटक म्हणजे तुम्ही जगत असलेली जीवनशैली हा आहे. खालील सवयींद्वारे दिसून येणारी अनारोग्यदायी जीवनशैली ही उच्च जोखीम समजली जाते:

धुम्रपान आणि मद्यपान

ज्या व्यक्ती धुम्रपान आणि मद्यपान नियमित करतात त्या विमा कंपन्यांसाठी उच्च जोखीम गटात येतात कारण की त्यांना दुर्धर आणि अतीगंभीर आजार होण्याची शक्यता जास्त असते, जसे कर्करोग, यकृताचा सिरॉसिस, रक्तदाब इ. विमा कंपनी तुमचा हप्ता हा तुमच्या तंबाखू सेवन, धुम्रपान आणि मद्यपानाच्या इतिहासानुसार वाढवू शकते.

बॉडी मास इंडेक्स (बीएमआय)

स्थूलता देखील तुम्हाला उच्च जोखीम क्षेत्रात टाकते, कारण की स्थूल व्यक्तींना हृदय व रक्तवाहिन्यासंबंधीचे  आजार आणि आरोग्याच्या इतर गुंतागुंती निर्माण होण्याची शक्यता खूप जास्त असल्याचे सिद्ध झाले आहे. बॉडी मास इंडेक्स १८ पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तींच्या वैयक्तिक आरोग्य विम्याचे हप्ते खुप वर जाऊ शकतात. एवढेच नाही तर तुमचा बीएमआय २५ अथवा त्यापेक्षा अधिक असल्यास एखादी कंपनी तुम्हाला पॉलिसी नाकारू देखील शकते.

एक वैयक्तिक आरोग्य विम्याचा योजना हा विशेषतः सर्वोत्तम आर्थिक संरक्षणाची खात्री करण्यासाठी तयार केला जातो. तुम्ही निवड करण्याबाबत काळजी घेतल्यास, हप्त्याबाबत चिंता करण्याचे कारण उरणार नाही.

अंतिम टीपा

लक्षात ठेवण्याच्या काही गोष्टी खालीलप्रमाणे आहेत:

अतिरिक्त संरक्षण टाळा

तुम्हाला जे लाभ खरोखर आवश्यक वाटतात त्यांच्यासाठीच केवळ पैसे भरा आणि जे केवळ चांगले दिसतात त्यासाठी नाही. उदाहरणार्थ, सुपर टॉपअप खरेदी करत असतांना तुमच्या कुटुंबातील तरुण सदस्यांना कदाचित त्याची गरज नसेल हे लक्षात घ्या. योग्य संरक्षणाचा योजना घेतल्यास तुमच्या हप्त्यात बचत होईल आणि तुलनात्मक अभ्यास तुम्हाला सर्वोत्तम पॉलिसी मिळवून देईल.

कौटुंबिक फ्लोटर खरेदी करा

जर तुमच्या कुटुंबात लहान मुले असतील तर कौटुंबिक फ्लोटर योजना हप्त्याची रक्कम कमी करतात. तरीदेखील, इथे थोडी काळजी घ्या कारण तुमच्या योजनामध्ये वरिष्ठ सदस्यांचा समावेश केल्यास हा योजना अधिक महाग देखील ठरू शकतो. कारण मग तुम्ही अशा सदस्यांना संरक्षित करत आहात ज्यांना एखादा आजारही असू शकतो आणि त्यामुळे तुमचा हप्ताही वाढू शकतो.

आम्ही तुम्हाला खात्री देतो की तुम्ही हुशारीने निवड केल्यास, तुम्ही सहजपणे काही पैसे वाचवू शकता. आमच्या शिफारस केलेल्या पोस्ट्सची यादी वाचा आणि आम्ही तुमची मदत करू शकू असे काही असल्यास आम्हाला नक्की कळवा.

सदर माहिती वाचण्यासाठी आम्ही आपले आभारी आहोत.